Monday, January 18, 2010

आणखी एक छोटंसं सुडोकू

या ब्लॉगचा उद्देश कोड्यांच्या विविध प्रकारांशी तुमची ओळख करून देणे हा असला तरी आपण सुरूवात सुडोकूपासूनच करू या.

सुडोकूमधील आकडे बघून बहुतेकांना वाटतं की हे गणिताचं कोडं आपल्याला काही जमणार नाही. इस्पिक, बदाम, किलवर आणि चौकट ही आपल्या परिचयाची चिन्हं असलेलं एक छोटंसं सुडोकू देऊन तुमचा हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मी या आधीच्या पोस्टमधून केला आहे.

आज मी जे सुडोकू देते आहे, ते या आधीच्या सुडोकूप्रमाणे छोटंसंच आहे.पण त्यात नेहेमीच्या सुडोकूप्रमाणे आकडेचं वापरले आहेत. या आकड्यांना घाबरून न जाता, हे आकडे ह्या कोडयात निव्वळ एक चिन्हं म्हणून आहेत हे लक्षात घेऊन, हे सुडोकू सोडवायचा प्रयत्न करा.



प्रत्येक आडव्या ओळीत, प्रत्येक उभ्या ओळीत, आणि ठळक रेषांनी दाखविलेल्या 2x2 च्या प्रत्येक चौरसात, १ ते ४ मधील प्रत्येक आकडा फक्त एकदाच येऊ शकतो.



(उत्तर पुढील भागात!)

Sunday, January 17, 2010

"एक छोटंसं सुडोकू - आकड्यांशिवाय"चे उत्तर

एका वाचकाने तरी या ब्लॉग वरचं पहिलं कोडं सोडवून बघितलं आणि त्याला ते सुटलं देखील! इतरांना अजूनही कोड्यांचा हा प्रकार आपल्यासाठी नाही असं वाटतंय का? प्रयत्न तर करून बघा. एखाद्या घरात कोणतं चिन्हं येणार हे ठरवताना, त्या घरात कोणती चिन्हं येऊ शकणार नाहीत ते आधी तपासून बघा.

"एक छोटंसं सुडोकू - आकड्यांशिवाय"चे उत्तर:


नविन वर्ष, नविन ब्लॉग

नविन वर्षाच्या सुरूवातीला हा ब्लॉग सुरू केला खरा, पण तो मराठी ब्लॉग विश्व वर जोडला गेला नसल्याने पोस्ट करायची टाळाटाळ केली. काल-परवाच कधीतरी माझा ब्लॉग मराठी ब्लॉग विश्व वर जोडला गेल्याचे लक्षात आले. बघू या आता नियमितपणे ब्लॉग लिहिला जातो का!

Thursday, December 31, 2009

एक छोटंसं सुडोकू - आकड्यांशिवाय

सुडोकू मधील आकडे बघून काही जणांना असं वाटतं की हे एक गणितावर आधारित कोडं आहे. त्यामुळे ते हे कोडं सोडवून बघायचा प्रयत्नंच करत नाहीत. त्यांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी हे एक छोटंसं सुडोकू .. आकड्यांशिवाय!

प्रत्येक आडव्या ओळीत, प्रत्येक उभ्या ओळीत, आणि ठळक रेषांनी दाखविलेल्या 2x2 च्या प्रत्येक चौरसात, प्रत्येक चिन्हं फक्त एकदाच येऊ शकतं.






(उत्तर पुढील भागात!)

Wednesday, December 30, 2009

राष्ट्रीय सुडोकू अजिंक्यपद स्पर्धा 2010

वर्तमानपत्रातील सुडोकू हे कोडं तुम्ही बघितले असेलच. तुमच्यापैकी काहीजण ते सोडवत सुद्धा असतील. पण दरवर्षी जागतिक सुडोकू अजिंक्यपद स्पर्धा भरविली जाते हे तुम्हाला माहीत आहे का? जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारा भारतीय संघ निवडण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय सुडोकू अजिंक्यपद स्पर्धा सुद्धा घेतली जाते.

पाचवी जागतिक सुडोकू अजिंक्यपद स्पर्धा एप्रिल २०१० मध्ये अमेरीकेत फिलाडेल्फिया येथे आयोजित करण्यात येणार आहे. तिथे जाणारा भारतीय संघ निवडण्यासाठी जानेवारी २०१० मध्ये राष्ट्रीय सुडोकू अजिंक्यपद स्पर्धा २०१० घेतली जाईल. अधिक माहितीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या:
http://logicmastersindia.com/ISC2010.asp